

Rajgad Fort Road Development
esakal
राजगड : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटक, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींची वाढती वर्दळ लक्षात घेता किल्ल्याला जोडणाऱ्या प्रमुख सहा रस्त्यांच्या सुधारणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सुमारे ५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.