
राजगडच्या निवडणूकीत ७ जागांसाठी ११ उमेदवार, १० जणांची बिनविरोध निवड
भोर : नंतनगर-निगडे (ता.भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीकरीता तीन गटांमधील ७ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी गुरुवारी (ता.१९) उमेदवारांची अंतीम यादी जाहीर करुन त्यांना चिन्हांचे वाटप केले. दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी बुधवारी (ता.१८) १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. निवडणूकीस सामोरे जाणा-या ११ उमेदवारांमध्ये ७ सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे, ३ राष्ट्रवादीचे आणि १ भाजपाचा उमेदवार आहे. तर बिनविरोध झालेले १० उमेदवार हे सत्ताधारी कॉग्रेस पक्षाचे आहेत.
गटानुसार निवडणूकीतील उमेदवार पुढील प्रमाणे - गट क्र. १ भोर देवपाल (२ जागा) - रामचंद्र पर्वती कुडले(राष्ट्रवादी), सुभाष मारुती कोंढाळकर(कॉग्रेस), उत्तम नामदेव थोपटे(कॉग्रेस). गट क्रमांक २ येवली-हातवे बु (३ जागा) - सुधीर चिंतामण खोपडे(कॉग्रेस), पंडीत रघुनाथ बाठे(राष्ट्रवादी), विलास अमृतराव बांदल(भाजपा), सोमनाथ गणपत वचकल(कॉग्रेस), पोपटराव नारायण सुके(कॉग्रेस). गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत (२ जागा) - रामदास किसन गायकवाड(राष्ट्रवादी), दिनकर सोनबा धरपाळे(कॉग्रेस), प्रताप धोंडीबा शिळीमकर(कॉग्रेस).
बिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे - गट क्रमांक ३ सारोळा-गुणंद-खंडाळा - किसन दौलतराव सोनवणे व दत्तात्रेय दिनकर चव्हाण. गट क्रमांक ४ कापूरव्होळ-वेळू-हवेली - विकास नथुराम कोंडे, शिवाजी खंडेराव कोंडे. मतदारसंघ ब वर्ग सहकार उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था - आमदार संग्राम थोपटे. अनुसुचित जाती जमाती - अशोक कोंडीबा शेलार. महिला राखीव प्रतिनिधी - सुरेखा अमोल निगडे व शोभा हरिभाऊ जाधव. इतर मागास प्रवर्ग - संदीप किशोर नगीने. भटक्या विमुक्त जाती जमाती- चंद्रकांत रामचंद्र सागळे.
राष्ट्रवादीचा बार फुसका
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने राजगडच्या निवडणूकीच्या छाननी प्रक्रीयेत निवडणूक निर्णय अधिकायांच्या अर्ज अवैध केल्याच्या विरोधात साखर आयुक्तांकडे अपील केले होते. साखर आयुक्तांनी अपील दाखल केलेल्या ११ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक मोठ्या प्रमाणात आणि चुरशीची होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र वैध ठरलेल्या ९ उमेदवारांपैकी राष्ट्रवादीचे २ आणि भाजपाचा १ असे ३ उमेदवार वगळता उर्वरीत ६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचा निवडणूकीचा बार फुसका निघाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.