

वेल्हे (पुणे) : आंबेगाव वनपरिमंडळातील वेल्हा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ओसाडे (ता.राजगड) येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत चार शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार (ता.२९) रोजी करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती राजगड तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.