

Authorities stated that teachers were required to remain present in schools despite students being granted a holiday due to heavy rainfall.
Sakal
वेल्हे (पुणे) : पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती मात्र शिक्षकांना कार्यालयीन कालावधीमध्ये शाळेत उपस्थित रहावे असे आदेशात नमूद करण्यात आले होते मात्र राजगड तालुक्यातील काही शिक्षकांनीच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर आले आहे. राजगड तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ व उपसभापती संदीप खुटवड यांनी मंगळवार (ता.०७) रोजी शाळेंना भेटी देताना हा प्रकार उघडकीस आला. याची गंभीर दखल गटविकास अधिकाऱ्यांनी घेत संबंधित शिक्षक व केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.