वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तालुक्यातील किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट धबधबा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी रविवारी (ता. २२) पासून ३० सप्टेंबर पर्यंत पर्यटनाला प्रशासनाने मनाई केली असल्याचा आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात काढले आहेत.