पुणे- पिंपरी चिंचवड वाहतूक औंधमार्गे सुरू; मुळेचा पुर थोडा ओसरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

राजीव गांधी पुलाच्या बाजूला पाण्याची पातळी कमी झाल्याने पिंपरी चिंचवडहून विद्यापीठमार्गे पुणे शहराकडे येणारी वाहने येऊ शकतात. परंतु अजून थोडे पाणी असल्याने या ठिकाणाहून जाताना वाहनचालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

औंध (पुणे) : मुळा नदीतील पाणी आज सकाळी ओसरायला सुरूवात‌ झाल्याने औंधहून पिंपरी चिंचवडकडे जाणारी वाहतुक सध्या सुरू झाली आहे. 

राजीव गांधी पुलाच्या बाजूला  पाण्याची पातळी कमी‌ झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गे पुणे शहराकडे येणारी वाहने येऊ शकतात.‌‌ परंतु अजून थोडे पाणी असल्याने या ठिकाणाहून जातांना वाहनचालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.‌ त्याचबरोबर महादजी शिंदे रस्त्यारील डी मार्ट जवळचा पूलही सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला असल्याची माहिती वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.

पाण्याची पातळी जर वाढलीच तर राजीव गांधी पुलावरील वाहतुकीबद्दल निर्णय घेतला जाईल, असेही कळवण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजताच्या परिस्थितीनुसार, औंधमार्गे पुणे शहराकडे व पिंपरी चिंचवडकडे जाण्यास मार्ग खुला झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi bridge open for vihicles near Aundh Pune