राजीव गांधींमुळे आधुनिक भारताची पायाभरणी ः चव्हाण

राजीव गांधींमुळे आधुनिक भारताची पायाभरणी ः चव्हाण
Published on

PNE26W43587
अहिल्यानगर ः राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले.
-----------------
राजीव गांधींमुळे भारताची
पायाभरणी ः चव्हाण
अहिल्यानगर, ता. २० ः राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले टाकली. पंचायतराज संस्थांना बळकटी देणे, युवकांना अधिक व्यापक राजकीय सहभागाची संधी यामुळे आधुनिक भारताची पायाभरणी झाली, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर दीप चव्हाण यांनी केले.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने कालिका प्राईड, लालटाकी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमास फिरोज खान, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, सुभाष रणदिवे, श्यामराव वागस्कर, अभिनय गायकवाड, गणेश भोसले, गालिब सय्यद, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.
राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या आधुनिक भारताच्या संकल्पनेचा आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.
पक्षाच्या माध्यमातून ‘शहर परिवर्तन गट’ उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील वाढती शहरी लोकसंख्या, बदलत्या नागरी गरजा आणि महानगरांमधील वाढत्या समस्या लक्षात घेऊन शहरी प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com