Thur, Feb 9, 2023

Pune : कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू
Published on : 1 December 2022, 12:25 pm
कात्रज : राजीव गांधी प्राणीसंग्रहलयातील गव्याची प्रकृती मागील 15 दिवसांपासून चिंताजनक होती. आज अखेर त्याचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्याचे वजन अचानक कमी व्हायला सुरवात झाली. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार सुरु होते. मात्र, त्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही.
आजारी गव्याचे वय हे 15 वर्ष होते. मागील काही दिवसांपासून हा गवा एका जागेवर बसून होता. प्राणीसंग्रहालयात असलेला हा गवा 5 वर्षांचा असताना आणला होता. त्यानंतर तो जवळपास दहा वर्षे एकटाच होता. मात्र, प्राणी संग्रहालयाने केरळमधील तिरुअनंतपुरम येथून नुकतेच दोन गवे आणले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील गव्यांची संख्या तीन झाली होती. आता या गव्याच्या निधनाने प्राणी संग्रहालयातील गव्यांची संख्या दोन झाली आहे.