Rajmata Jijau Jayanti : जिजाऊंनी खरंच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajmata Jijau Shivaji Maharaj
Rajmata Jijau Jayanti : जिजाऊंनी खरंच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता का?

Rajmata Jijau Jayanti : जिजाऊंनी खरंच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता का?

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. याच दोन महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्र घडवला. त्याचीच गोष्ट आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र घडवला. त्यापूर्वी परकीय शत्रूंच्या कोंडीमध्ये हा प्रदेश सापडला होता. शहाजीराजे निजामशाहीत असताना मुरार जगदेव याने पुण्यावर हल्ला केलाय त्यावेळी पुण्यात भीषण दुष्काळ पडला होता.

हेही वाचा: Rajmata Jijau Jayanti : पुण्यातील लाल महालाचा इतिहास, दुरुस्तीकरण अन् बरंच काही...

तरीही शहाजीराजेंना आव्हान द्यायचं म्हणून त्याने पुणे उध्वस्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि पहार मारली. इथल्या प्रदेशात कधीच समृद्धी येणार नाही, याचं ते सूचक होतं. अशी घटना घडल्यावर त्या जागेवर कुणी फिरकायचं नाही, ते अशुभ असतं, हे त्यावेळी मानलं जायचं.

हेही वाचा: Rajmata Jijau Jayanti : मुलगीच हवी! जिजाऊंच्या जन्मासाठी लखुजीराजे जाधवांनी केला होता नवस

गाढवाचा नांगर फिरल्यानंतर पुणे उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर इथली जहागीर पुन्हा एकदा शहाजीराजांच्या ताब्यात आली आणि बाल शिवाजीसह जिजाऊ पुण्यामध्ये दाखल झाल्या. त्यांनी पुण्याचं वैभव परत आणण्याचा चंग बांधला आणि बाल शिवाजीसह पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. हे प्रतिकात्मक होतं. त्यानंतर या भागामध्ये वस्त्या उभारल्या गेल्या. जमिनी कसल्या. खऱ्या अर्थाने या दिवशी हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.