नागठाणे राज्यात अव्वल
वीरगाथा प्रकल्पात राजनंदिनी राज्यात प्रथम
कौतुकास्पद यश; प्रजासत्ताकदिनी पुण्यात संचालकांच्या हस्ते गौरव
नागठाणे, ता. २३ : वेणेगाव (ता. सातारा) येथील राजनंदिनी संदीप घोरपडे हिने वीरगाथा प्रकल्पात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल प्रजासत्ताकदिनी तिचा पुण्यात गौरव होणार आहे.
राजनंदिनी इयत्ता पाचवीत शिकते. दर्जा अन् गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या जावळी तालुक्यात आसनी या शाळेची ती विद्यार्थिनी. देशातील नागरिक अन् सशस्त्र दलातील अधिकारी यांच्या शौर्य, बलिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शुरांच्या प्रेरक जीवनकथा विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी, त्यांच्यात नागरी सजगतेची भावना निर्माण करण्यासाठी वीरगाथा प्रकल्प राबविण्यात येतो. त्यात देशभरातील सर्व २८ राज्यांतील व आठ केंद्रशासित प्रदेशातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा महाराष्ट्रातून तीन लाखांहून अधिक विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. त्यातून निवडल्या गेलेल्या ४०२ प्रवेशिकांत राजनंदिनी अव्वल ठरली. प्रजासत्ताकदिनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या संचालकांच्या हस्ते तिचा सत्कार होणार आहे. याआधी गेल्या वर्षीही तिने या उपक्रमात दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले होते.
मुख्याध्यापक संपत शेलार, संजीवन निकम, शशिकांत शेलार, सुषमा खटावकर यांचे राजनंदिनीला मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी मिलन मुळे, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप आदींनी तिचे अभिनंदन केले.
चौकट
-------
जिल्हा परिषद शाळेस प्राधान्य
----------
राजनंदिनीचे वडील संदीप घोरपडे अन् आई रसिका हे दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी कोणत्याही खासगी शाळेची निवड न करता आसनीच्या प्राथमिक शाळेस प्राधान्य दिले. राजनंदिनी चित्रकलेत निपुण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यापूर्वी तिला गौरविले आहे.
फोटो - राजनंदिनी घोरपडे
NGT26B08094
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

