
पुणे : ‘‘सर्व धर्मांमध्ये मूलभूत तत्त्वे सारखीच सांगितलेली आहेत. धर्म हे त्या-त्या काळातील माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. कदाचित ती आजही काही माणसांसाठी आवश्यक असेल. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आणि माणसाचा द्वेष करत नाही. जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधार नाही. माणसाने धर्म घरापुरता ठेवावा. सार्वजनिक जीवनात जात आणि धर्मकारण टाळावे लागते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी केले.