भाजपला घालविण्यासाठी आम्ही आघाडीसोबत : राजू शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यात नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडी सरकारसंदर्भात आज (रविवार) राष्ट्रवादीच्या कोअर समितीची पुण्यात बैठक होत आहे. त्यापूर्वी राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली.

पुणे : भाजप सरकार घालवणे हा पर्याय म्हणून आम्ही आघाडी बरोबर आहोत. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो, त्यामुळे आघाडी बरोबर चर्चा झाली नाही, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाशिवआघाडी सोबत असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडी सरकारसंदर्भात आज (रविवार) राष्ट्रवादीच्या कोअर समितीची पुण्यात बैठक होत आहे. त्यापूर्वी राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली.

राजू शेट्टी म्हणाले, की ''राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर राज्यपालांनी तुटपुंजी मदत जाहीर करून मीठ चोळले आहे. सरकार कोणाचेही आले तरी, सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी बांधावर होतो त्यामुळे आघाडी बरोबर चर्चा झाली नाही.''

...तर आम्ही पिक्चर दाखवू : देवेंद्र भोयर
''शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शेतकरी संघटना आंदोलन करेल. बच्चू कडू यांनी फक्त ट्रेलर दाखवला, आम्ही पिक्चर दाखवू. राष्ट्रपती हे गुजरातच्या इशाऱ्यावर चालतात व राज्यपाल नागपूरच्या इशाऱ्यावर चालतात. आम्ही 2 दिवस राष्ट्रपतिंना भेटायला गेलो होतो ते भेटले नाहीत'', असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju shetty is With Mahashivaghadi to Remove BJP