राजूरमध्ये कायमस्वरूपी बाजारतळाचा मार्ग मोकळा; ग्रामस्थांमध्ये आनंद

राजूरमध्ये कायमस्वरूपी बाजारतळाचा मार्ग मोकळा; ग्रामस्थांमध्ये आनंद
Published on

राजूरमध्ये बाजारतळाचा प्रश्न मार्गी
राजूर, ता. ११ : अकोले शहराप्रमाणेच राजूरमध्येही कायमस्वरूपी बाजारतळ उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापारी व शेतकऱ्यांकडून केली जात होती. जागेअभावी हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पुढाकारातून गव्हाळी परिसरातील कुंभारी विहिरीलगत असलेल्या सुमारे ५० ते ६० गुंठे गावठाण जागेची स्वच्छता करण्यात आली असून, या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारतळ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. भविष्यात याच ठिकाणी आठवडे बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
या बाजारतळामुळे राजूर ग्रामस्थ, भाजीपाला व फळविक्रेते, स्थानिक व्यापारी, तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. बाजारासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाल्यास व्यापाराला चालना मिळण्यासह नागरिकांची गैरसोयही दूर होणार आहे.
गावहिताच्या या उपक्रमाला सर्व स्तरांतून सहकार्य मिळाल्यास राजूरमध्ये लवकरच सुसज्ज बाजारतळ उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com