राजुरी येथे महिलांचा कार्यक्रम संपन्न

राजुरी येथे महिलांचा कार्यक्रम संपन्न

Published on

राजुरीत महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. ७ : जिल्हा परिषद शाळा, राजुरी (ता. करमाळा) येथे महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. विद्या दुरंदे यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेमध्ये महिलांची संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेण्यात आला.
संगीत खुर्ची स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या श्यामल जाधव यांनी मानाची पैठणी जिंकली. द्वितीय क्रमांक अर्चना दुरंदे यांनी ग्लास सेट, तृतीय क्रमांक रेश्मा सराटे यांनी स्टील वॉटर बाॅटल अशी बक्षिसे मिळवली. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपाहार देण्यात आला. अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अप्पासाहेब निरगुडे, अनिल साखरे, उपाध्यक्ष एकनाथ साखरे, मुख्याध्यापक सुभाष पानसरे, शाळेतील शिक्षक रोडे, ढवळे, बोराडे, कुदळे, तसेच अंगणवाडी सेविका व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सुरवसे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com