साई पब्लिक स्कूलमधील राजवर्धन सुरवसे पंदसंतुलन स्पर्धेत व भागात प्रथम तर राज्यात तृतीय
MDH26B05034
अहिल्यानगर : पदसंतुलन स्पर्धेत विभागात प्रथम व राज्यात तृतीय आलेल्या राजवर्धन सुरवसे याचे पदक देऊन अभिनंदन करताना क्रीडाशिक्षक.
साई स्कूलच्या सुरवसे
पंदसंतुलन स्पर्धेत तृतीय
............
माढा, ता. २३ : वेताळवाडी (ता. माढा) येथील श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित साई पब्लिक स्कूलमधील राजवर्धन रवी सुरवसे याने अहिल्यानगर येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये शालेय विभागीय पदसंतुलन या क्रीडा प्रकारात विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच राजवर्धन याने नागपूर येथे शालेय राज्यस्तरीय पदसंतुलन या स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल त्याचा संस्थापक डॉ. मगन सुरवसे, संचालक डॉ. रवी सुरवसे, समन्वयक डॉ. शीतल सुरवसे, प्राचार्या नीता कट्यारे, मार्गदर्शक दत्तात्रय जाधवर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

