विंग. राजवीर सादळे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय
निबंध स्पर्धेत राजवीर सादळे दुसरा
विंग, ता. २० : स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्याने विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात येथील आदर्श विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी राजवीर मनोज सादळे याने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. लहान गटात यश त्याने मिळवले. डाॅ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्याविषयी त्याने निबंध लेखन केले. साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. प्राचार्य सीताराम गवळी, प्राचार्य डाॅ. राजेंद्र शेजवळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्याला गौरविले. विद्यालयाच्या निबंध विभाग प्रमुख वनिता पाटील यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. शीतल सादळे यांचा तो मुलगा असून, विद्यालयातर्फे मुख्याध्यापक टी. आर. फकीर यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. पर्यवेक्षक श्रीकांत सावंत, एन. आर. पाटील, श्रीशैल चव्हाण, श्री. सनदी, एस. व्ही. जाधव, सुहास कुंभार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, शाळा विकास समिती, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, सदस्यांनी त्याचे कौतुक केले.
B02201
विंग : राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल राजवीर सादळे याचा सत्कार करताना टी. आर. फकीर. त्या वेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

