राजयोग धूरी यांच्या गायनाने पंढरपूरकर मंत्रमुग्ध

राजयोग धूरी यांच्या गायनाने पंढरपूरकर मंत्रमुग्ध

Published on

UPR26B07207
पंढरपूर : स्वरसुधा कार्यक्रमात शास्त्रीय गायन सादर करताना राजयोग धुरी व इतर कलाकार.
..........
राजयोग धुरी यांच्या गायनाने पंढरपूरकर मंत्रमुग्ध
..........
नवीन वर्षानिमित्त गायन कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती
........
पंढरपूर, ता. ४ : नवीन वर्षानिमित्त व (कै) माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रातील छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम राजयोग धुरी यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धुरी यांच्या सुमधुर गायनाने पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते गायक राजयोग धुरी, प्रवीण बानकर, माधव कुलकर्णी, ज्ञानेश्वर दुधाणे, डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.
शास्त्रीय संगीतातील मुरलीधर श्याम या बंदिशीने राजयोग धुरी यांनी आपल्या गायनाला सुरवात केली. कार्यक्रमादरम्यान त्यांनी अनेक प्रसिद्ध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग रचना सादर केल्या. माझे माहेर पंढरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, वृंदावनी वेणू, माझे जीवन गाणे, ऐसी लागी लगन, घेई छंद मकरंद विविध प्रकारचे अभंग सादर केले. शेवटी कानडा राजा पंढरीचा या अभंगांने स्वर तरंग कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे निवेदन अभय नलगे यांनी केले. हार्मोनिअमची साथ प्रवीण बानकर, तबला प्रसाद करंबेळकर, पखवाज प्रथमेश तारळकर, सिंथेसाईजर ज्ञानयोग धुरी टाळ यश‌ खाडे आदींनी सुंदर साथसंगत करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com