
पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन शनिवारी (ता. ९) पुण्यात उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा, मिठाईची दुकाने आणि भेटवस्तूच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली होती. बहिणींकडून भावांना राखी बांधण्याची लगबग सुरू होती, तर भावांनीही बहिणींना आवडीनुसार भेटवस्तू, मिठाई आणि खास भेट देऊन आनंद द्विगुणित केला. मात्र, त्याचवेळी त्यांना वाहतूक कोंडीचाही फटका बसला.