अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘रक्षा कलश दर्शन यात्रा’

अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘रक्षा कलश दर्शन यात्रा’

Published on

​लोणावळा, ता.१ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘रक्षा कलश दर्शन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (ता.१) नाणे मावळातील पाथरगाव येथून ही यात्रा सुरू झाली.
यावेळी नागरिकांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.

यात्रेसाठी एका विशेष रथाची निर्मिती करण्यात आली असून, त्यावर अजितदादांची भव्य प्रतिमा लावण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, पीएमआरडीए सदस्या दीपाली हुलावळे, रेश्मा देवकर, समीर जाधव, लक्ष्मण बालगुडे, अमोल केदारी, किरण हुलावळे, भरत येवले, ताईबाई केदारी, राजू देवकर विविध गावाचे सरपंच, राजकीय नेते यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी कलशाचे दर्शन घेऊन अजित पवार श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मावळ व राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण काढत अनेक नागरिक भावुक झाले होते. ‘‘ही यात्रा म्हणजे केवळ श्रद्धांजली नसून, अजितदादा पवार यांच्या विचारांना आणि कार्याला जिवंत ठेवण्याचा संकल्प आहे,’’ अशी भावना तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी यावेळी व्यक्त केली.
दिवसभरात पिंपळोली, ताजे, बोरज, घरकुल, मळवली, पाटण, डोंगरगाववाडी, केवरे वसाहत, डोंगरगाव, कुणे नामा आदी गावांतून मार्गक्रमण करत पांगळोली येथे यात्रेचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com