३९ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात वर्गमित्र एकत्र

३९ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात वर्गमित्र एकत्र
Published on

कडूस, ता. १० ः कडूस (ता. खेड) येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३९ वर्षानंतर एकत्र जमून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सन १९८७-८८ या शैक्षणिक वर्षात दहावीत शिकणारे विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमले होते.
स्नेहमेळाव्याची सुरुवात रोहिणी केदारी, नंदा तुपे, शामल खळदकर, कल्पना जाधव, स्वाती कहाणे, संगीता अरगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तर, सेवानिवृत्त फौजी श्याम पिंगळे, संजय देशमुख, आनंदा पानमंद, संदीप चिपाडे, सतीश चिपाडे, सुभाष ढमाले, बाळासाहेब गाढवे, अविनाश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मृत्यू पावलेल्या वर्गमित्र सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दहावीच्या या बॅचचे माजी विद्यार्थी माणिक ढमाले यांची राज्य मंत्रालयात मृद व जलसंधारण खात्याच्या अपर सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच दुसरे वर्गमित्र डॉ. राजेश बनकर यांची शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल वर्गमित्रांनी फेटा बांधून स्मृतीचिन्ह देत त्यांना सन्मानित केले. या वेळी चक्रधर खळदकर, फर्जना शेख, वंदना जाधव, कांताराम चव्हाण, सुनील जाधव, माणिक शिंदे, आप्पासाहेब खंडागळे, बंडू पोटे, अनुराधा बोरकर, मीरा म्हसे यांनी मनोगत व्यक्त केले. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्यासाठी प्रकाश गारगोटे, आप्पासाहेब खंडागळे, उपेंद्र शहा, सुभाष ढमाले, गणपत भुजबळ, अविनाश शिंदे, प्रशांत केदारी, राम मंडलिक, रंजना भांगरे, कल्पना जाधव यांनी परिश्रम घेतले. आप्पासाहेब खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com