Ram navami
Ram navamisakal

Ram navami 2023 : श्री क्षेत्र चास येथील श्री राम मंदिरात रामजन्मोत्सव ऊत्साहात साजरा

चास येथील श्री राम मंदिरात कित्येक पिढ्यांपासून साजरा होणारा

चास : श्री क्षेत्र चास ( ता.खेड ) येथील सुमारे एकशे एक्कावन्न वर्षापुर्वीच्या पुरातन श्री राम मंदिरात रामनवमी निमीत्त विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, श्री राम कथा, श्री रामाच्या पालखी सोहळ्याने चास वासीय भक्तिसागरात न्हाऊन निघाले, किर्तनकार ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज पुरोहित यांच्या रामजन्माच्या किर्तनाने भावीक मंत्रमुग्ध झाले.

चास येथील श्री राम मंदिरात कित्येक पिढ्यांपासून साजरा होणारा ह्या राम जन्मोत्सवा निमीत्त सकाळी श्रीं च्या मूर्तिस अभिषेक सुरेश चासकर, योगेश जोशी, सुहास दस्तुरे, अनिल जोशी, उल्हास जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तदनंतर ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज पुरोहित यांच्या सूश्राव्य वाणीत श्री राम जन्माचे किर्तन सादर झाले. दुपारी साडे बारा वाजता फुलांची उधळण करत राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Ram navami
Pune : इंदापुर पोलिसांनी पकडला 18 लाख 8 हजाराचा गुटखा ; दोघांना अटक,

यावेळी उपस्थित सौ. स्वाती चासकर, सौ. स्मिता चासकर, सौ. उमा ठाकूर, सौ. वर्षा चासकर, सौ. नम्रता चासकर, सौ. अनघा चासकर, ऋच्या बर्वे, अपुर्वा चासकर, श्रृती चासकर यांसह अनेक महिलांनी राम जन्माचा पाळणा म्हणत राम जन्माचे स्वागत केले. तदनंतर श्री रामाच्या मूर्तीची टाळ मृदूंगाच्या गजरात पालखीतून ग्राम प्रदक्षिणा करूण श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर,

Ram navami
Pune Bypoll Election: पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार का? कायदेतज्ज्ञ काय सांगतात

सोमेश्र्वर मंदिर असा देव भेटीचा कार्यक्रम पार पडला. पालखी मंदिरत आल्यावर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समीती, समस्त ब्राम्हण मंडळी ब्राम्हण आळी, नवयुग प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ चास व पंचक्रोशी तसेच लक्ष्मीकांत चासकर, सुर्यकांत चासकर, हेमंत जोशी, कुमार साठे, विजय साठे, डॅा. पी. एस. ठाकूर, जयंत साठे, अनुराग चासकर, नंदू चासकर, चंद्रकांत चासकर यांच्या अधिपत्याखाली संपुर्ण सोहळा पार पडला.

राजेंद्र लोथेः चास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com