पुणे : मुक्ता मनोहर यांना रमाबाई रानडे पुरस्कार प्रदान

प्रणिता मारणे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

 पुणे : सार्वजनिक काका सभागृह संस्थेतर्फे कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना रमाबाई रानडे पुरस्काराने गौरवण्यात आले.
 

 पुणे : सार्वजनिक काका सभागृह संस्थेतर्फे कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना रमाबाई रानडे पुरस्काराने गौरवण्यात आले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ३ हजार १ रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. जग वैद्नन्यानिक दृष्टीकोनातून बदलत आहे. रूढी, परंपरांच्या अनिष्ट प्रथांमधून बाहेर पडून आपणही पुढे जायला हवे. असा, विचार मुक्ता मनोहर यांनी पुरस्काराला उत्तर देताना मांडला.

कै.ग.वा.जोशी तथा सार्वजनिक काका यांनी स्थापन केलेली पुणे सार्वजनिक सभा ही संस्था शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०) वर्षात पदार्पण करीत आहे. मागील तीन वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना पुरस्काराने गौरवण्यात येते.

Web Title: Ramabai Ranade award given to Mukta Manohar