पुणे : रमजान ईद निमित्त अतिरिक्त पोलिस आयुक्तांची मस्जिद व मंदिरला भेट

हिंदु-मुस्लिम ऐक्याची जुनी परंपरा पुढेही जतन करा
पुणे शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण
पुणे शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाणsakal

घोरपडी: गावामधील जयहिंद चौक येथे तन्जिम यंग बाॅईजच्या वतीने ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रुपच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्व नागरिकांना शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात आले.हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या घोरपडी गावातील जामा मस्जिद व काशीविश्वेश्वर महादेव मंदिरला पुणे शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, मुंढव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी उपस्थित नागरिकांसह भेट दिली. यावेळी नागरिकांनी मंदिर व मस्जिदचा गौरवशाली इतिहासाची माहिती आयुक्तांना दिली.

यावेळी बोलताना अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी आपल्या बालपणीच्या ईदच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आज परिस्थितीत गावातील हिंदू- मुस्लिम एकता पाहून आनंद वाटला असे सांगत, आज कोणी काहीही बोलले तरीही तुमच्यातील प्रेम कायम राहू द्या. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत हा एकोपा टिकून ठेवा. हिंदु-मुस्लिम ऐक्याची जुनी परंपरा पुढेही जतन करा, असा गावकऱ्यांना सल्ला दिला.

घोरपडी गावात जामा मस्जिद व काशीविश्वेश्वर महादेव मंदिर यांच्यामध्ये कोणतीही भिंत नाही. दोन्ही धार्मिक वास्तूमध्ये एकच समान भिंत आहे. साधारण 90च्या दशकामध्ये गावातील एकता टिकावी यासाठी मंदिराचे बांधकाम सुरू असताना हिंदू - मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन भिंत न बांधण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हे मंदिर- मस्जिद हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com