
जुन्नर : सुमारे चारशे वर्षांच्या परंपरेनुसार जुन्नर- नारायणगाव रस्त्यावरील इस्लामपुरा येथील उंच टेकडीवर असलेल्या ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी रमजान ईद निमित्त आज सोमवार ता. ३१ रोजी सकाळी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक शांतता व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली.