
निरगुडसर - वयाच्या एकाहत्तरीत अनेक जणांना काठीचा आधार घेऊन चालावे लागते पण याला अपवाद आहे. ते आंबेगाव तालुक्यातील वयाच्या एकाहत्तरीत पोहचलेले हरिश्चंद्र रामभाऊ थोरात. वयाच्या एकाहत्तरीत पण पदकांचा ओघ सुरूच असून गेल्या ११ वर्षात त्यांनी सव्वाशे पदकांची कमाई केली आहे.