आठवले म्हणतात, 'राज ठाकरेंना काय काम नाही'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नसल्याने ते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांना भेटून काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी यापेक्षा राज ठाकरेंनी पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली.

पुणे : राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नसल्याने ते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत. या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांना भेटून काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी यापेक्षा राज ठाकरेंनी पक्ष वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली.

पुण्यात नविन विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक कांबळे,  राजाभाऊ सरोदे यावेळी उपस्थित होते. 

आठवले म्हणाले, ''विरोध गलितगात्र झाले आहेत, त्यामुळे ते आता इव्हीएमला पुढे करुन सरकारवर निशाना साधत आहेत. काँग्रेसने तेव्हा मतपत्रिकेवर बोगस मतदान होते. म्हणून इव्हीएम मशिन समोर आणले. आता मोदींना मतदान मिळतेय म्हणून मशिनवर संशय घेतले जात आहे. लोकांमध्ये मोदींबद्दल भावना चांगली आहे, त्यामुळे आपोआप कमळाकडे बटन जात. राष्ट्रवादीचे घड्याळ दहा दहाच्या पुढे जात नाही, आणि काँग्रेसचा हात हालत नाही.

''मोदी उस्तादांचा उस्ताद आहे, जाती धर्माच्या पलिकडे गेलेला माणूस आहे.  आमची मतपत्रिकेवर निवडणूकीला समोर तयारी आहे, तरीही मोदी जिंकले तर पुन्हा मतदान केंद्र ताब्यात घेतले, अधिकाऱ्यांनी शिक्के मारले असा आरोप करतील,''अशा शब्दांत टोला लावला. 

''विधानसभेसाठी २२जागांसाठी पत्र दिले आहे,  त्यातील १० जागा मिळाल्या पाहिजेत.  पुण्यातून कँन्टोन्मेंट व पिंपरी या दोन जागांची मागणी केली आहे,''असे आठवले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas athawale criticize raj thackeray