Ambegaon Politics: आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात खळबळ'राजकारणाला पूर्णविराम; समाजसेवेचा प्रवास मात्र सुरूच ठेवणार! महाविकास आघाडीचे नेते रमेशभाऊ येवले

Rameshbhau Yewale Political Retirement : आंबेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते रमेशभाऊ येवले यांनी सोशल मीडियाद्वारे राजकीय वाटचालीतून निवृत्ती जाहीर केली. बदलती राजकीय संस्कृती आणि जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Rameshbhau Yewale announces his retirement from politics and vows to continue social service through Moraya Social Trust.

Rameshbhau Yewale announces his retirement from politics and vows to continue social service through Moraya Social Trust.

esakal

Updated on: 

मंचर : आंबेगाव तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय असलेले, दांडगा जनसंपर्क आणि दानशूर व्यक्तिमत्त्व अशी ओळख निर्माण केलेले महाविकास आघाडीचे नेते रमेशभाऊ येवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रविवारी (ता. १) त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केल्याने आंबेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामागील नेमकी भूमिका काय, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...