मंचरमध्ये गीत-संगीत मैफिल

मंचरमध्ये गीत-संगीत मैफिल
Published on: 

मंचर, ता. १५ : दिवाळीनिमित्त भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथे जीवन मंगल कार्यालयात शारदा प्रतिष्ठानच्या वतीने ‘रामरंगी रंगल्या! २०२६’ या गीत-संगीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे बहारदार सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजाने आणि कलाविष्काराने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. सचिन गाडे यांची होती. सूत्रसंचालन माधुरी गाडे यांनी केले. तबला वादन गणेश जगदाळे (मुंबई), पखवाज वादन शुभंकर शिंदे, हार्मोनिअम वादन डॉ. सचिन गाडे यांनी केले. ध्वनी संयोजन संकेत कर्पे यांनी सांभाळले. अवनीत बांगर, काव्या गावशेते, मितांशी वर्पे, अद्विका जाधव, वेद गुजराथी, संस्कार लायगुडे, सानिका लांडे, रिया मोरडे, शिवांश वायाळ, आराध्या गरुड, दक्ष टेमकर, अनुष्का ककडेकर, सात्त्विक गाडे, कृष्णांगी निकम, मोक्षिता शिंदे, ओवी घुले, तन्वी विश्वासराव, वेदक्षी सावळे, श्वेत मुळे, सौरवी शेजवळ, युतिका पारखे आणि लब्धी गांधी या विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. उपस्थितानी भरभरून दाद दिली.
विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, संगीत परंपरा आणि कलागुणांचा आविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सादरीकरणातील आत्मविश्वास हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.