राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात 
आणखी दोन जणांना अटक
Published on: 

बारामती, ता. २३ : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे.
चैतन्य बाबर व स्वप्नील कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, ज्ञानेश्वर साळुंखे व निनाद महाडीक हे दोघे फरारी असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ज्ञानेश्वर साळुंखे याला राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन मुलांची गरज होती. निनाद महाडीक हा त्याचा मित्र होता. त्याने निनादला ही बाब सांगितली. निनाद याच्या ओळखीचा स्वप्नील कांबळे होता. त्याने दोन मुले शोधून आणण्याची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार एक विधीसंघर्षग्रस्त बालक आणि पार्थ वासुदेव अवथळे या दोघांवर हल्ल्याची जबाबादारी सोपविण्यात आली होती.
दरम्यान, पार्थ अवथळे याने त्याच्या जबाबात चालक असलेल्या ज्ञानदेव महादेव शिंदे याने या हल्ल्यासाठी दोन लाख रुपये देऊ केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात ज्ञानेश्वर साळुंखे हा ताब्यात आल्यानंतरच याचा खरा सूत्रधार कोण होता व कोणत्या कारणासाठी हा हल्ला केला गेला, ही माहिती पुढे येईल, असे नारायण पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com