
‘रानडे इन्स्टिट्युट’च्या स्थलांतरणाचा निर्णय अखेर रद्द
पुणे : रानडे इन्स्टिट्युटमधील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या एकत्रीकरण आणि हस्तातंरणाचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवारी अखेर रद्द केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाला (रानडे इन्स्टिट्युट) शनिवारी भेट दिली. त्यानंतर विद्यापीठाने निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग या दोन्ही विभागांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा: मोदी सरकार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीपेक्षा 'फाळणी'ला अधोरेखित का करतंय?
मात्र रानडे इन्स्टिट्युट विद्यापीठात स्थलांतरीत करण्याच्या वादानंतर अखेर दोन्ही विभागांच्या एकत्रिकरणास विद्यापीठाने शुक्रवारी स्थगिती दिली होती. आता शनिवारी अखेर हा निर्णय रद्द करण्यात आला. दरम्यान संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या विकासाचे नवीन प्रारूप तयार करण्याचे आदेश सामंत यांनी विद्यापीठाला दिला आहे, असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
Web Title: Ranade Institute Migration Decision Canceled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..