

‘श्रीराम’ स्वतःच्या हिमतीवर चालवा
रणजितसिंह; फलटणमधील अनेकांचे भाजपमध्ये प्रवेश
फलटण, ता. १९ : स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला असून, त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. त्यासाठी मी कुणाकडूनही रुपया घेतला नाही. तुम्हीही श्रीराम कारखाना भागीदारी तत्त्वावर इतरांना चालवण्यास देण्यापेक्षा तुमच्या हिमतीवर कारखाना चालवून दाखवा, असे आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांना पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, फलटण तालुक्यातील अनेकांचे भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने त्यांना पाहवत नसल्याची टीकाही केली.
यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नरसिंह निकम, अमरसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, अमित रणवरे, रणजितसिंह भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
रणजितसिंह म्हणाले, ‘‘रामराजेंच्या शिव्याशापांकडे आम्ही लक्ष देत नाही; परंतु साखरवाडीत बोलताना त्यांनी एका तरुणीबाबत केलेली टीका निषेधार्ह असून, राजकारणासाठी अशा प्रकारची टीका करताना त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? ते तालुक्यात नकारात्मकता पसरवत आहेत. माझा स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला आहे. त्यासाठी मी कुणाकडूनही रुपया घेतला नाही.’’ ते १५ कोटी काय १५० कोटी गोळा करतील; परंतु श्रीराम चालविण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? असा सवाल करून तुम्ही आजोबांनी काढलेल्या सगळ्या सहकारी संस्था विकल्या. तुमच्या हिमतीवर कारखाना चालवून दाखवा. आमची डेअरीही आम्ही स्वतःच्या हिमतीवर चालवली होती. ३० वर्षे अडकून राहिलेले नीरा-देवघरचे पाणी आपण पुढे आणले आणि यातूनच मी खासदारकीच्या पराभवाची किंमत मोजली आहे. तालुक्यात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत, हे समजल्यामुळेच त्यांच्याकडून अफवा उठवल्या जात असल्याचेही ते म्हणाले.
फोटो- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.