

आंधळगाव, ता. १३ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिल्याने पती गंभीर, तर पत्नी किरकोळ जखमी झाली. अपघातानंतर मदत न करता चालक पसार झाला. दरम्यान, न्हावरे पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
वैभवी स्वप्निल राक्षे-कदम (वय २२, रा. रांजणगाव सांडस) यांनी याप्रकरणी सोमवारी (ता. ११) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवी आणि पती स्वप्निल राक्षे गुरुवारी (ता. ७) रात्री साडेसातच्या सुमारास भाजीपाला घेऊन दुचाकीवरून (एमएच १२-क्यूएल ०४९८) घरी परतत होते. भोसलेवस्ती येथील दूध डेअरीसमोर समोरून आलेल्या भरधाव मोटारीने (एमएच १२-डब्ल्यूके ३७४१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात स्वप्निल यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर केडगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत वैभवी यांच्या डोळ्याला व गुडघ्याला मार लागला आहे. अपघातानंतर कारचालकाने जखमींना मदत न करता पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बनकर पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.