
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : अक्षयतृतीयेच्या सणाचा गोडवा जपत आज रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे महागणपती चरणी ५००१ हापूस आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळच्या आरतीनंतर याच आंब्यांचा प्रसाद भाविकांत वाटल्याने देवाच्या दारात गणेशभक्तांचा सण गोड झाला.