

Extortion Demand in Industrial Area
शिरूर : 'आमच्या हद्दीत काम करायचे असेल तर दरमहा पन्नास हजार रूपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्या गाड्या चालू देणार नाही, गाड्या फोडून टाकू', अशी धमकी देत एका महिला व्यावसायिकाचा टेम्पो अडवून टेम्पोच्या चालकाला दमदाटी; तर सुपरवायझरला मारहाण केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरूद्ध खंडणीसह मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (ता. २०) दुपारी दीड च्या सुमारास रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) परीसरात हा प्रकार घडला.