

Four-Member Tyre Theft Gang Arrested in Shirur
Sakal
शिरूर : घराबाहेर, मोठ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये किंवा भाजी मार्केटमध्ये उभ्या केलेल्या पिकअप जीप हेरून टायरसह त्यांची चाके चोरून नेणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले. गुन्ह्यासाठी वापरलेल्या मोटारीसह सुमारे दहा लाख रूपये किंमतीचे टायर या टोळीकडून जप्त करण्यात आले.