Fake Security Jobs Trap Youth
sakal
शिरूर : रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांत बंदोबस्ताचे काम देण्याचे अमिष दाखवून ड्रेस किटच्या नावाखाली ३७ मुले व दहा मुलींकडून प्रत्येकी चार हजार रूपये प्रमाणे तब्बल सत्तर हजार रूपये वसूल करणाऱ्या आणि कुठलीही नोकरी न देता उलट या मुला - मुलींना शिवीगाळ, दमदाटी करीत धमकावणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नोकरीच्या नावाखाली लुबाडणूक व फसवणूकीचे प्रकार एमआयडीसीत वारंवार घडत असून, स्थानिकांबरोबरच आता बाहेरगावहून येथे येऊन नसते उद्योग करणारांचा अशा गुन्ह्यातील सहभाग वाढू लागला आहे.