

Worker Dies After Brutal Assault in Ranjangaon; Police Intensify Action and Add Murder Charges
sakal
शिरूर : रागाने बघून खुन्नस दिल्याच्या कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन कामगारांवर कोयता, फायटर, सिमेंटचे गट्टू आणि दगड वीटांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान, जखमीच्या निधनानंतर पुन्हा तणावाचे वातावरण पसरले आहे.