

Haridwar to Ranjani Promoting Health and Environment
Sakal
निरगुडसर : सायकल चालवा,तंदुरुस्त रहा आणि प्रदूषणमुक्त परिसर ठेऊन पर्यावरण वाचवा असा संदेश देत आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील डॉ.संजय वाघ आणि शरद वाघ या दोन युवकांनी हरिद्वार ते रांजणी असा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला,आतापर्यंत या दोघांनी विविध ठिकाणी आठ हजार किमीहून अधिक सायकल प्रवास पूर्ण केला आहे. स्वामी रामदेव बाबा-योग गुरु पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या हरिद्वार येथे पतंजली योगपीठात पाच दिवसीय योग शिबिर पूर्ण करून हरिद्वार ते रांजणी असा सायकल प्रवास पूर्ण केला. सायकलस्वार शरद वाघ त्याचप्रमाणे आम्हाला बॅकअप व्हॅनमधून साथ देणारे तीन मित्र सोबत होते.