आईच्या मित्राकडुनच जिवे मारण्याची धमकी देत बारा वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार

जनार्दन दांडगे
Friday, 20 November 2020

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे एका बारा वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत, मुलीच्या आईच्या मित्राकडुनच मागिल वर्षभरापासुन मुलीवर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पिडीत मुलीच्या पोटात दोन दिवसापुर्वी वेदना होत असल्याने, मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

लोणी काळभोर (पुणे) - कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे एका बारा वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत, मुलीच्या आईच्या मित्राकडुनच मागिल वर्षभरापासुन मुलीवर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पिडीत मुलीच्या पोटात दोन दिवसापुर्वी वेदना होत असल्याने, मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी, शाम भाऊराव पवार (वय- ३५, रा. लोणीस्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली) या नराधमा विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच शाम पवार हा कदमवाकवस्ती परीसरातुन फरार झाला असुन, आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.

डिसेंबरमध्ये "अच्छे दिन'ची आस; हॉटेल व्यावसायिक प्रतीक्षेत

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता (नाव बदलले आहे) ही तिस वर्षीय परप्रांतीय महिला कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागिल तीन वर्षापासुन राहत असुन, ति पुणे स्टेशन परीसरात भिक मागुन आपला व आपल्या बारा वर्षीय बबली (नाव बदलले आहे) या मुलीचा उदरनिर्हाव करते. आरोपी शाम पवार हा ही पुणे स्टेशन परीसरात भिक मागत असल्याने, अनिता व शाम हे दोघेजण मागिल दिड वर्षापासुन लिव्ह इन रिलेशनशिपमघ्ये अनिताच्या घऱी एकत्र राहत आहेत. अनिता भिक मागण्यासाठी घरातुन बाहेर पडताच, शाम पवार हा बबली हिला जिवे मारण्याची धमकी देऊन मागिल एक वर्षापासुन तिच्यावर बलात्कार करत होता. मात्र शाम पवार याच्याकडुन जिवाची भिती असल्याने, मागिल वर्षभरापासुन बबली शाम पवार याचे अत्याचार निपुटपणे झेलत होती. 

पदवीधर-शिक्षक निवडणूक :आजी-माजी मंत्री मैदानात उतरणार 

दरम्यान मागिल चार दिवसापासुन बबली हिच्या पोटात वेदना होत असल्याने, अनिता घऱीच होती. अनिता भिक मागण्यासाठी का जात नाही यावरुन शाम पवार व अनिता यांच्यात भांडण झाले होते. यावेळी शाम पवार याने अनिताला शिवीगाळ व मारहान केली होती. याबाबतची तक्रारही अनिताने लोणी काळभोर पोलिसात दाखल केली होती. मात्र अनिता तक्रार देण्यासाठी पोलिसात जात असल्याचे लक्षात आल्याने, शाम पवार याने तक्रार दाखल होण्यापुर्वीच घरातुन पळ काढला होता. दरम्यानच्या काळात बबली हिच्या पोटातील वेदना वाढल्याने, अनिताने बबली हिची र्पेगनेंट टेस्ट केली असता, बबली दोन महिण्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. यावर अनिताने बबली हिस विश्वासात घेऊन विचारना केली असता, शाम पवार याचे कारनाने पुढे आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्सनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. रणवरे करत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on Girl by Mother Friend crime