खूशखबर ! वारजेतील बारटक्के रुग्णालयात रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट मोफत सुरु

Rapid antigen corona test started free of cost at Bartakke Hospital in Warje
Rapid antigen corona test started free of cost at Bartakke Hospital in Warje
Updated on

वारजे(पुणे) : वारजे, कर्वेनगर, उत्तमनगर, शिवणे भागातील नागरिकांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी सिंहगड रोड, वडगाव व कर्वे रोडवरील एसएनडीटी महाविद्यालय अशा ठिकाणी जावे लागत होते. मात्र, आता या सर्वांसाठी एक चांगली बातमी असून वारजेतील बारटक्के रुग्णालयात रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट मोफत केंद्र सुरु करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या भागातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. काही नागरिकांच्या चाचण्या होत नव्हत्या. तर अनेकांना या संदर्भात मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे वारजे भागामध्ये कोरोना चाचणी केंद्र असावे अशी मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत वारजे येतील महापालिकेच्या  कै. अरविंद गणपत बारटक्के रुग्णालयामध्ये बुधवार पासून रॅपिड अँटीजन किटद्वारे कोरोनाची तपासणी  सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

बुधवारी जवळपास 141 नागरिकांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकूण 22 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती महापालिकेच्या डॉ. अरुणा तारडे यांनी दिली. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक मधुकर कारकूड, ऋतुराज दीक्षित, सचिन सावंत, किरण जाधव, रामदास आडारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या कोरोना रॅपिड चाचणीमुळे या भागातील वारजे कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर येथील नागरिकांना आपली कोरोना चाचणी करून घेणे सोपे होणार आहे. यामध्ये विशेष करून तपासणी केल्याल्यानंतर लगेच एका तासामध्ये सदर व्यक्तीचा अहवाल मिळणार आहे.

पुढील दिवसात जवळपास दररोज 200 नागरिकांची येथील रुग्णालयात रॅपिड अँटीजन किटद्वारे कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील कोणावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली. येथे चाचणी केंद्र सुरू केल्याबद्दल माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी रुग्णालय सुरू केल्याचे सार्थक झाले असल्याचे सांगितले. येथे होणारी ही कोरोना चाचणी सर्वांसाठी मोफत असून या भागातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. तसेच महापालिकेला सहकार्य करावे असे मत बाबा धुमाळ यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com