बारामती - तालुक्यातील सुपे येथे प्रभू श्रीरामचंद्रांना व गणपतीला हृदयात ठेवा असा संदेश देणारा शिलालेख सापडला आहे. छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत या महत्वाच्या पदावर असणारी व्यक्ती बारामतीच्या सुपे येथील होती, हेही यानिमित्ताने पुढे आले आहे. पराक्रमासोबतच धार्मिक कार्यातही सुमंत यांचा सहभाग यामुळे अधोरेखित झाला आहे.