

राशी मगरच्या शतकाने बी. व्ही. जे. संघाची बाजी
पुणे, ता. २० ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित एमसीएच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राशी मगरने केलेल्या नाबाद (११०) शतकाच्या जोरावर बी. व्ही. जे. संघाने रायगड संघाचा सात गडी राखून पराभव केला.
या सामन्यात रायगड संघाने २०४ धावा केल्या यावेळी वैदवी वावेकरने नाबाद ९७ धावांची खेली केली. प्रत्यूत्तर देताना बी. व्ही. जे. संघाने ३ बाद २०७ धावा करून विजय मिळविला त्यात प्रमुख वाटा राशी मगरने केलेल्या नाबाद (११०) शतकाचा होता.
संक्षिप्त धावफलक :
१) रायगड संघ - (३४.१ षटकांत) सर्वबाद २०४ (वैदवी वावेकर नाबाद ९७, आरुषी मौर्या २३, शुभ्रा शिवपुजे २-३१, तनिष्का गायकवाड २-४३, ईश्वरी माणगावे २-४०) पराभूत विरूद्ध बी. व्ही. जे. संघ - (३२.५ षटकांत) ३ बाद २०७ (राशी मगर नाबाद ११०, आनंदी कांबळे नाबाद २५).
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.