esakal | पुण्याच्या रश्मी ऊर्ध्वरेषे यांना मिळाला ‘नारीशक्ती’ पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmi Upwardesh of Pune receives the Narikshakti National Award of 2019

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपतीभवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ‘नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०१९’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 

पुण्याच्या रश्मी ऊर्ध्वरेषे यांना मिळाला ‘नारीशक्ती’ पुरस्कार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली/पुणे : वाहन उद्योग क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात 'एआरएआय'च्या संचालक रश्मी उर्द्धरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपतीभवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ‘नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०१९’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिलांच्या सक्षमीकरणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील १६ महिला व संस्थाना या वेळी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून रश्मी ऊर्ध्वरेषे यांना वाहन उद्योग क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. रश्मी ऊर्ध्वरेषे या गेल्या ३६ वर्षांपासून ऑटोमोबाईल आणि संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत असून, केंद्र सरकार संचालित ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया’ (एआरएआए) संस्थेच्या २०१४ पासून अध्यक्ष आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि वाहन उद्योग क्षेत्रात महिलांचा टक्का वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उभारण्यात आलेल्या हरित वाहतुकीला समर्पित देशातील पहिल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Women's Day :  चित्रांमधली जुगलबंदी साधणाऱ्या मैत्रिणी