एकरकमी एफआरपीसाठी ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर- विजयपूर महामार्गावर वडकबाळ, पुणे -विजयपूर मार्गावर मंद्रुप आणि सोलापूर- पंढरपूर मार्गावर तुंगत येथे आंदोलन करण्यात आले. सरकार आणि कारखानदारांविरोधातील घोषणांनी वातावरण दणाणून गेले. तसेच ऊसदराच्या मागणीवरून शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेनेही वैराग (ता. बार्शी) येथे रास्ता रोको आंदोलन केले. 

सातारा जिल्ह्यात सातारा, कराड व फलटण या तालुक्‍यांत अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. कोरेगाव तालुक्‍यात कुमठे, खटावमध्ये तर इंदोली आणि कराड तालुक्‍यात पाचवड फाटा आणि मसूर येथील प्रमुख चौकात येथे रास्ता रोको करण्यात आले. यानंतर सह्याद्री साखर कारखान्यावर जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसगाळप बंद पाडल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी सांगितले. सातारा तालुक्‍यातील शिवथर या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ऊसदराचा फॉर्मुला कारखानदार आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मान्य झाल्याने साताऱ्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rasta Roko for FRP