
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहा क्रमांकाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याचा प्रकार सुमारे पंधरवड्यापूर्वी घडला. बेशुद्ध पडल्यामुळे या विद्यार्थ्याला औंधमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थी चिंताक्रांत झाले आहेत.