दिलासादायक! कोरोनमुक्तीच्या प्रमाणात राज्यात होतेय वाढ

Corona-Patient-Release
Corona-Patient-Release
Updated on

पुणे - कोरोनाबाधीतांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या पाच आठवड्यांमध्ये वाढत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 86 टक्के असल्याचेही सार्वजनिक आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसते.

राज्यातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान पुण्यात 9 मार्चला झाले. राज्यात 9 मार्च ते 3 मे या 56 दिवसांमध्ये (आठ आठवडे) सोमवारी सकाळी दुपारपर्यंत 12 हजार 974 कोरोनाबाधीतांची नोंद आरोग्य खात्यात झाली. त्यापैकी दोन हजार 115 रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. नव्याने निदान होणारे रुग्ण आणि कोरोनामुक्त होऊन घरी जाणारे निरोगी नागरिक यांची आठवडानिहाय केलेल्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई, पुणे आणि ठाण्यात काय घडतंय

  • देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात निदान झालेल्या 12 हजार 974 पैकी आठ हजार 800 रुग्ण (68 टक्के) एकट्या मुंबईमध्ये आहेत. त्या खालोखाल पुण्यात एक हजार 396 (11 टक्के) आणि ठाण्यात एक हजार 142 (9 टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे. 
  • महाराष्ट्राच्या 87 टक्के रुग्ण एकट्या या तीन मोठ्या शहरांमध्ये आढळले आहेत. 
  • राज्यात दोन हजार 115 रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्णही मुंबईमध्येच आहेत. करोनाबाधीतांचे राज्याच्या तुलनेतील प्रमाण 68 टक्के असलेल्या मुंबईमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या एक हजार 230 (58 टक्के) आहे. 
  • पुण्यात कोरोनाबाधीतांची संख्या एक हजार 396 (11 टक्के) तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 16 टक्के (339) आहे. 
  • ठाण्यात एक हजार 142 कोरोनाबाधीत (9 टक्के) आणि कोरोनामुक्त होणारे 250 (12 टक्के) असल्याचे दिसते. 

कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या

  • राज्यात दोन दिवस विलगिकरण कक्षात ठेवल्यानंतर चोवीस तासांमध्ये दोन स्वॅब निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना घरी सोडले जाते. त्या प्रमाणे तिसऱ्या आठवड्यापासून राज्यातील बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यास सुरवात झाली. 
  • राज्यात आतापर्यंत घरी सोडलेल्या दोन हजार 115 कोरोनामुक्त नागरिकांपैकी 927 रुग्ण आठव्या आठवड्यात घरी सोडले. आतापर्यंत एका आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वांत मोठा आकडा ठरला. 
  • तिसऱ्या आठवड्यात राज्यातील 35 रुग्णांना घरी सोडले. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक आठवड्यात घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 
  • 6 एप्रिलपासून कोरोनाबाधीत रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण वाढताना दिसते. 6 ते 12 एप्रिल या पाचव्या आठवड्यात 13 टक्के रुग्ण कोरोनामुक्त तर, नव्याने आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण 87 टक्के होते. 
  • 28 दिवसांमध्ये कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण 13 वरून 20 टक्क्यांपर्यंत वाढले. कोरोनाबाधीतांचे प्रमाण 87 वरून 80 पर्यंत कमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com