हापूसची पेटी @ २१ हजार ५०० रुपये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

फळबाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची एक पेटी दाखल झाली आहे. यंदा फेब्रुवारी आला, तर थंडी कमी असल्यामुळे रत्नागिरी आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन महिने उशिरा सुरू झाली आहे. पाच डझनांच्या या एका पेटीस बोली लावून घाऊक बाजारात २१ हजार ५०० रुपये भाव मिळाला.

मार्केट यार्ड - फळबाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची एक पेटी दाखल झाली आहे. यंदा फेब्रुवारी आला, तर थंडी कमी असल्यामुळे रत्नागिरी आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन महिने उशिरा सुरू झाली आहे. पाच डझनांच्या या एका पेटीस बोली लावून घाऊक बाजारात २१ हजार ५०० रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन केले. या वेळी फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, अडते असोसिएशनेचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, प्रताप निकम, रामदास गायकवाड, भरत परदेशी, संजय वखारे, तात्या कोंडे, राजू ओसवाल, राजू पतंगे, आण्णा हराळे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, राजू सूर्यवंशी, अनिरुद्ध भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, अजिंक्‍य कांचन, बलभीम माजलगावे उपस्थित होते. रावसाहेब कुंजीर या अडत्याने लिलावात ही पेटी खरेदी केली.

रत्नागिरीतील टेंभे गावातील सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून ही आवक झाली. यंदा थंडी अजूनही कमी असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याचे व्यापारी अनिरुद्ध भोसले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Hapus mango one box twenty-one thousnad