जिल्ह्यात घरा, गोठ्यांचे ५० लाखांचे नुकसान

जिल्ह्यात घरा, गोठ्यांचे ५० लाखांचे नुकसान
Published on

रत्नागिरीत घरे, गोठ्यांचे ५० लाखांचे नुकसान

रत्नागिरी ः वादळासह शनिवारी (ता. ९) पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. सहा तालुक्यांतील साडेतीनशे घरांसह गोठे, शासकीय इमारतींचे मिळून सुमारे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वेगवान वाऱ्यामुळे विजेचे खांब, वाहिन्या तुटून गेल्यामुळे महावितरणला ८० लाखाचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत घरांचे आणि गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छतावरील पत्रेच्या पत्रे वाऱ्याबरोबर उडून गेले. रत्नागिरी शहराजवळील मिरकरवाडा बंदरातील स्थिती भयानक होती. लोखंडी पत्रे पाला-पाचोळ्यासारखे उडून जात होते. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७३ घरे आणि गोठ्यांचे १७ लाख १९ हजाराचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील २४ घरांसह १ अंगणवाडी आणि २ शासकीय इमारतींचे मिळून सुमारे १५ लाख, मंडणगड तालुक्यातील ११७ घरांचे ५ लाखांचे, संगमेश्वर तालुक्यातील ११ घरांना फटका बसला असून ५ लाख २८ हजारांचे नुकसान झाले आहे. चिपळुणात ३८ घरांचे २ लाख ३४ हजारांचे अंशतः नुकसान झाले. दापोलीसह लांजा तालुक्यातही नुकसान झाले असून पंचमाने सुरू आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले, तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील काम अद्याप सुरू आहे. महावितरणची पथके अहोरात्र राबून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, लांजा तालुक्यातील झापडे येथील समीर हाजू यांची पपईची बाग उद्धवस्त झाली आहे. करारावर घेतलेल्या ४ हेक्टर जमिनीत त्यांनी पपईची लागवड केली होती. त्यातील ३ हेक्टर ४० गुंठ्यांवरील पपईची झाडांना फटका बसला. काही झाडे मोडून गेली तर, पपई गळून गेले आहेत. लांजा कृषी विभागाकडून पंचनामा केला जात आहे. तर सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com