रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० एमएलडी जादा पाणी महापालिका उचलणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) जादा पाणी महापालिका उचलणार आहे. त्यापोटी पाटबंधारे विभागाकडे दंडाची रक्कम भरणार आहे. यासाठी रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील यंत्रांची आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

पिंपरी - वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) जादा पाणी महापालिका उचलणार आहे. त्यापोटी पाटबंधारे विभागाकडे दंडाची रक्कम भरणार आहे. यासाठी रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील यंत्रांची आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या विषयास महापालिका सर्वसाधारण सभेने सोमवारी (ता. २०) मंजुरी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटबंधारे विभागाने पवना धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित केले आहे. रावेत येथे नदीवर बंधारा बांधून अशुद्ध जलउपसा केला जात आहे. निगडी- प्राधिकरणातील सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाण्याचे वितरण होत आहे. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० एमएलडी जादा पाणी उचलण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी अशुद्ध जलउपसा केंद्रांतील पंपाची आणि निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवावी लागणार आहे. या कामाच्या खर्चापोटी महापालिका अर्थसंकल्पात ‘विशेष योजना’ लेखा शिर्षाखाली नव्याने समावेश करावा लागणार आहे. त्यासाठीच्या ५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यासाठीचा ऐनवेळचा विषय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्यास सभेने मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. वाढीव पाण्याची गरज व सद्यःस्थिती याबाबतची वस्तुस्थिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांनी मांडली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravat dam will take 100 MLD extra water daily from Municipal Corporation