Rave Party Tulapur
sakal
पुणे/केसनंद - श्रीक्षेत्र तुळापूर येथे झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी, लोणीकंद पोलिसांनी संबंधित फार्म हाऊस सील केले आहे. दरम्यान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पवित्र बलिदान भूमी असलेल्या तुळापूरला शिवराज्याभिषेक दिनी पार्टीची परवानगी प्रशासनाने दिलीच कशी, असा संतप्त सवाल करीत ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.